इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय ऑटोमोबाईल मार्केट गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड विकसित झाले आहे. तसेच ह्युंदाई वाहनांचा प्रतीक्षा कालावधी खूप मोठा आहे. तथापि, सेमीकंडक्टरच्या जागतिक कमतरतेमुळे, बहुतेक कार उत्पादक कंपन्यांच्या प्रतीक्षा यादीत वाढ झाली आहे. ह्युंदाईच्या वाहनांच्या प्रतीक्षा कालावधीबद्दल आपण जाणून घेणार आहोत, यामध्ये क्रेटा, वेर्ना, अल्काझार इत्यादी कारच्या नावांचा समावेश आहे.
ह्युंदाई व्हर्ना :
यात पेट्रोल कार MT आणि IVT साठी प्रतीक्षा कालावधी अनुक्रमे 16 ते18 आठवडे आणि 10 ते12 आठवडे आहे. तसेच डिझेल कार MT आणि AT च्या बाबतीत, प्रतीक्षा कालावधी अनुक्रमे 16 ते 18 आठवडे आणि 12 ते 18 आठवडे आहे.
अल्काझर
अल्काझार 1.5-लीटर पेट्रोल प्लॅटिनम 7S साठी किमान प्रतीक्षा कालावधी 2-4 आठवडे आहे. Prestige 7S देखील सुमारे 4-6 आठवडे आहे. प्लॅटिनम (O) 6S + 7S साठी सर्वाधिक प्रतीक्षा कालावधी आहे, जो 8 ते 10 आठवड्यांमध्ये वितरित केला जाईल.
नवीन अल्काझार :
1.5-लिटर डिझेलचा प्रतीक्षा कालावधी सर्वात कमी आहे, जेथे प्लॅटिनम 7S आणि सिग्नेचर 6S प्रकारांची निवड करणाऱ्या ग्राहकांना 6-8 आठवडे प्रतीक्षा करावी लागेल. तर टॉप मॉडेल (प्रेस्टीज (O) AT 7S) साठी प्रतीक्षा कालावधी 12 ते 14 आठवडे आहे. यापूर्वी, 1.5-लीटर पेट्रोल प्लॅटिनम 7S प्रकारासाठी किमान प्रतीक्षा कालावधी 6-8 आठवडे होता. प्रेस्टिज 7S साठी सर्वाधिक प्रतीक्षा कालावधी 18 ते 20 आठवडे होता. अल्काझारच्या इतर पेट्रोल आणि डिझेल प्रकारांना 10 ते 12 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी होता.
creta :
सर्व ह्युंदाई कारमध्ये क्रेटाचा प्रतीक्षा कालावधी सर्वात जास्त आहे. क्रेटा 1.5-लिटर पेट्रोल S/S IMT/S+ SE व्हेरियंटचा प्रतीक्षा कालावधी 24 ते 28 महिने आहे. 1.4-लिटर टर्बो पेट्रोलसाठी, S+ DCT ला 26 ते 30 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. क्रेटा 1.5-लिटर डिझेलचा प्रतीक्षा कालावधी S/S+ SE, SX आणि SX Exec आणि SX(O) AT/SE प्रकारांसाठी 26 ते 30 महिने आहे.
i20 :
i20 पेट्रोल मॅन्युअल प्रकारासाठी प्रतीक्षा कालावधी 6-8 आठवडे आहे. IVT आणि DCT प्रकारांसाठी प्रतीक्षा कालावधी अनुक्रमे 8-10 आठवडे आणि 10-12 आठवडे आहे. i20 डिझेल प्रकारासाठी प्रतीक्षा कालावधी 8-10 आठवडे आहे. i20 चा प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करण्यात आला आहे. पूर्वी MT साठी 8-12 आठवडे, IVT साठी 16-20 आठवडे आणि DCT साठी 14-18 आठवडे होते. i20 डिझेलसाठी प्रतीक्षा कालावधी आधी 12-14 आठवडे होता.
Indian Automobile Industry Cars demand waiting period