गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या तीन राज्यात भारतीय लष्कराच्या टास्क फोर्सद्वारे पूरग्रस्तांसाठी बचाव आणि मदतकार्य सुरू

by Gautam Sancheti
जुलै 25, 2021 | 1:17 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
image004M4S9

नवी  दिल्ली – भारतीय सेनेच्या  तिन्ही सेवांनी नागरी प्रशासन आणि राष्ट्रीय तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबरोबर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या पूरग्रस्तांसाठी मदत आणि  बचाव कार्य सुरू केले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली या सर्वाधिक बाधित भागातील आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाशी सुयोग्य समन्वय साधून भारतीय सैन्याने पायदळ , इंजिनिअर्स, दळणवळण, बचावकार्य आणि वैद्यकीय पथके यांचा समावेश असलेली कृतीदले या बाधित झालेल्या  क्षेत्रात तैनात केली आहेत. या पथकांनी आपल्या बचाव आणि  मदतकार्याने  चिपळूण, शिरोळ, हातकणंगले, पलूस आणि मिरज भागात अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

image0019YWY

image002ZD6T

कर्नाटकात भारतीय नौदलाने नेव्हल डायव्हर्स, रबराच्या ‘जेमिनी’ बोटी, लाइफ जॅकेट्स आणि पूर मदत कार्यांसाठी वैद्यकीय उपकरणे यासह सात सुसज्ज पूर मदत पथके कार्यरत  केली आहेत. या पथकाने कादरा धरणाजवळील सिंगुड्डा आणि भैरे या गावातून १६५ लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले, तर ७० लोकांना कैगाच्या सखल भागातून बाहेर काढले.

image003788U

नेव्हल सीकिंग, प्रगत लाइट हेलिकॉप्टर्स आणि भारतीय वायुसेना एमआय -17 हेलिकॉप्टर्स यांनी मिळून अनेक उड्डाणे केली आणि पाण्याच्या पातळीत अचानक आणि प्रचंड वाढ होऊन अडकलेल्या लोकांची सुटका केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच बचाव आणि  मदत कार्याची योजना आखण्यासाठी त्यांनी बाधित भागाचे अनेकदा हवाई सर्वेक्षण केले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ)  सुमारे ४०० जवानांना भुवनेश्वर, कोलकाता आणि वडोदरा येथून महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी तसेच गोवा येथे ४० टन बचाव सामुग्रीसह विमानाने पाठवण्यात आले.

 

image0051HPS

या तिन्ही सेवांची  पथके पूरग्रस्त भागातील स्थानिकांना वाचवण्यासाठी तसेच त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहेत.याव्यतिरिक्त  अधिक बचाव कार्यपथके  आणि विमाने तैनात आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

क्या बात है! भारतीय शास्त्रज्ञांनी लावला हा शोध; अंतराळ क्षेत्राला मिळणार नवा आयाम

Next Post

चांदवड तालुक्यातील गणुर येथे राज्य कृषी विभाग सचिवांची भेट, कृषी योजनांची केली पाहणी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0yR538bcAA85YQ e1758203148768
राष्ट्रीय

आता या परिक्षेत उमेदवारांच्या चेहेरा प्रमाणीकरणासाठी AI चा वापर…

सप्टेंबर 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Next Post
IMG 20210725 WA0155

चांदवड तालुक्यातील गणुर येथे राज्य कृषी विभाग सचिवांची भेट, कृषी योजनांची केली पाहणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011