चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुस्तीचा सराव सुरु असताना चांदवड तालुक्यातील हरनूल येथील भारतीय सैन्य दलातील जवान विक्की अरूण चव्हाण (२५) यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. श्रीनगरला कार्यरत असताना त्यांना वीरमरण आले आहे. चव्हाण यांच्या निधनामुळे कुटुंबासह संपूर्ण हरनूल गावावर शोककळा पसरली आहे.
बारावी पास झाल्यानंतर विक्की चव्हाण हे भारतीय लष्करात दाखल दाखल झाले. आता विक्की हे श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. ते स्वतः कुस्तीपटू असल्याने अनेक स्पर्धांच्या निमित्ताने सराव करत असत. काल सायंकाळी कुस्तीचा सराव सुरु असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे.
विक्की यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली होती. त्यामुळे ते रोजच कुस्तीचा सराव करत असत. या स्पर्धेच्या तयारीसाठी काल सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ते कुस्तीचा सराव करत असतांना त्यांना वीरगती प्राप्त झाली. विक्की हे बारावी पास झाल्यानंतर भारतीय लष्करात दाखल दाखल झाले होते.
देवळालीतील एसव्हीकेटी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी
भगूर येथील स्वा.सै.न.ल.बलकवडे व्यायामशाळेत इयत्ता चौथीपासूनच कुस्ती प्रशिक्षणासाठी असलेल्या विकी हा अतिशय मनमिळावू व मित्रांमध्ये प्रसिद्ध होता. यादरम्यान २०१६ ते २०१७ दरम्यान येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. या दरम्यान त्याने कुस्तीपटू म्हणून राष्ट्रीय स्तरापर्यंत आपली मजल मारली होती. त्यानंतर २०१९ साली स्पोर्ट्स कोठ्यातून त्याने मेरिट प्राप्त करत निवड चाचणी दरम्यान त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून तेथील मध्य प्रदेशच्या सागर सेंटर येथे कमांडींग ऑफिसरने थेट निवड केलेला हा कुस्तीपटू होता. येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ व बलकवडे व्यायामशाळेतील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
Unfortunate death of an Indian Army jawan in Chandwad taluka
Indian Army Jawan Wrestling Practice Death Chandwad
Nashik District Rural