नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी 47 टँक-72 ब्रिज लेइंग टँकच्या खरेदीसाठी आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या हेवी वेहिकल्स फॅक्टरीसोबत एकूण 1,560.52 कोटी रुपयांचा करार केला आहे. 21 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि एचव्हीएफ /एव्हीएनएल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षरी केली.
ब्रिज लेईन्ग टँक हे एक महत्वपूर्ण उपकरण आहे, जे यांत्रिक फोर्सद्वारे आक्रमण/बचावात्मक मोहिमांदरम्यान पूल बांधण्यासाठी वापरले जाते. हे टँक आणि आर्मर्ड व्हेईकल फ्लीटला पूल बनवण्याची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे युद्धभूमीवर गतिशीलता आणि आक्रमण क्षमता वाढते. या उपकरणाची खरेदी (भारतीय-स्वदेशी बनावटीची) असल्यामुळे संरक्षण क्षेत्रातील मेक-इन-इंडिया उपक्रमाला चालना मिळेल. एकूण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात आणि देशातील रोजगाराच्या संधी वाढवण्यातही हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.