नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय लष्कराने नोंदणीकृत अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी तसेच त्यांना बँकिंग सुविधा प्रदान करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि बंधन बँक या ११ बँकांबरोबर सामंजस्य करार केला आहे. लेफ्टनंट जनरल व्ही श्रीहरी, डीजी (एमपी आणि पीएस) आणि बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी भारतीय लष्कराचे ऍडज्युटंट जनरल, लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
अग्नीवीर वेतन पॅकेज अंतर्गत असलेली वैशिष्ट्ये आणि लाभ संरक्षण वेतन पॅकेज सारखेच आहेत. याव्यतिरिक्त, बँकांनी अग्निवीरांना त्यांच्या उद्योजकीय कौशल्यांना चालना देण्यासाठी आणि वाढविण्यासाठी अल्प दराने कर्ज (सॉफ्ट लोन) देऊ केली आहेत. “अग्निपथ योजने” अंतर्गत अग्निवीरांची पहिली तुकडी जानेवारी २०२३ पर्यंत प्रशिक्षण केंद्रांमध्ये सामील होणार आहे.