नवी दिल्ली – सियाचीन हिमशिखरांजवळील तेहराम शेर हिमशिखरांमधील पाच अस्पर्शित शिखरे सर करण्यासाठी निघालेल्या मोहिमेला ९ ऑगस्ट २०२१ रोजी चीफ ऑफ स्टाफ, फायर अँड फ्युरी कोअर मेजर जनरल आकाश कौशिक यांनी सियाचेन बेस कॅम्प वरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. भारतीय लष्करातील लडाख स्काऊट तुकडीतील गिर्यारोहक एकाच वेळी APSARASAS I, APSARASAS II, APSARASAS III, PT-6940 आणि PT-7140 ही शिखरे सर करण्याचा प्रयत्न करतील. बेस कॅम्पवर आयोजित सोहळ्याला सियाचेन बेस कॅम्पवर तैनात तुकड्या तसेच भारतीय लष्करात सेवा बजावलेल्या दिग्गज स्थानिकांची उपस्थिती होती.