इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट हा अनेक भारतीयांचा आवडता खेळ आहे. क्रिकेट खेळता येत नसले, तरी क्रिकेटची मॅच पाहण्यात बहुतांश जणांना आनंद वाटतो, साहजिकच क्रिकेटमधील खेळाडूंच्या विषयी देखील जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. भारतात अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत त्यापैकीच एक म्हणजे रवींद्र जडेजा होय. आजच्या काळात सर जडेजा या नावाने प्रसिद्ध असलेल्या रवींद्र जडेजाला कोण ओळखत नाही ? मात्र, जडेजा क्रिकेटर कसा बनला हे आपण जाणून घेणार आहोत.
भारताने जागतिक क्रिकेटला एका पेक्षा एक ऑलराउंडर खेळाडू दिले आहेत. जडेजा हा अलीकडच्या काळातील टीम इंडियाचा महत्त्वाचा दुवा आहे आणि त्याची गणना जगातील सर्वोत्तम ऑलराउंडर्समध्ये केली जाते.मोठ्या स्पर्धांमध्येही रवींद्र जडेजा टीम इंडियाची पहिली पसंती असणार आहे. रवींद्र जडेजा सध्या बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्हींमध्येही जबरदस्त कामगिरी करत आहे मात्र त्याचे बालपण खूप गरीबीत गेले.
जडेजाचा जन्म दि. 6 डिसेंबर 1988 रोजी गुजराती राजपूत कुटुंबात झाला. रविंद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग हे सेक्यूरिटी गार्ड होते. तर, आई लता या नर्स होत्या. जडेजाला रनजितसिंह आणि दुलिपसिंह हे भाऊ आहेत. त्याची बहीण नैना ही नर्स आहे. जडेजाने क्रिकेटर व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती. मात्र, 2005 मध्ये जडेजाची आई लता यांचे निधन झाले. यानंतर जडेजाने जवळपास क्रिकेट सोडले होते. पण त्याची मोठी बहीण नयना हिने त्याला साथ दिली आणि संपूर्ण कुटुंबाची काळजीही घेतली. यानंतर जडेजाने पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात केली.
क्रिकेट मधील खेळाडूंची मैदानावरील मेहनत तर आपण सर्वच जण बघतो, पण टीम इंडियामध्ये एक असा खेळाडूही, आहे ज्याने हा पल्ला गाठण्यासाठी कठोर परिश्रमांसोबतच अनेक अडचणींचाही सामना केला आहे. भारतीय खेळाडू रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटीत आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर श्रीलंकेस जेरीस आणले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना नाबाद १७५ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीमध्ये श्रीलंकेच्या पाच खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शानदार अष्टपैलू कामगिरी करणारा तो आता जगातील सहावा क्रिकेटपटू ठरला होता. एका डावात १५० हून अधिक धावा आणि ५ बळी घेण्याचा पराक्रम याआधी दोन भारतीय खेळाडूंनी केला आहे.
गरीब परिस्थितीमुळे वडिलांना सुरक्षा रक्षक म्हणून काम करावे लागले, तर मोठ्या बहिणीने घर सांभाळले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही हा खेळाडू जगातील सर्वोत्तम ऑलराउंडर्सपैकी एक ठरला आहे. जडेजाच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने आर्मी बनावे. त्याच्या वडिलांनी त्याला आर्मी शाळेतही टाकले होते. पण आई त्याला क्रिकेटसाठी पाठिंबा देत असायची. आईची इच्छा म्हणून तो क्रिकेटर बनला.
जडेजा हा त्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे 2006मध्ये 19 वर्षांखालील पाकिस्तान संघाने अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय संघाला पराभूत केले. तर, 2008मध्ये विराट कोहलीच्या 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या विजयात जडेजाचेही योगदान होते. तसेच जडेजा आयपीेलच्या राजस्थान रॉयल्स संघात असताना शेन वॉर्नने त्याला ‘रॉकस्टार’ नाव दिले होते. तर, भारतीय संघसहकाऱ्यांनी त्याचे ‘जड्डू’ असे नाव ठेवले. तसेच सोशल मीडियावरती जास्त तर ‘सर’ या नावाचा वापर केला जातो.
सध्या जडेजाकडे ऑडी ए4 ही कार आहे. तसेच त्याच्याकडे सुझुकी हयाबुसा ही कारही आहे. त्याच्या व्यतिरिक्त शिखर धवनकडेही सुझुकी हयाबुसा ही कार आहे. या शिवाय जडेजाला घोडे पाळण्याची आवड आहे. त्याच्याकडे गंगा आणि केसर असे 2 घोडे आहेत. तो त्यांना जामनगर जवळील आपल्या फार्महाऊनमध्ये ठेवतो.क्रिकेट व्यतिरिक्त जडेजाहा बिजनेसमनही आहे. राजकोटमध्ये त्याचे जड्डूज फूड फिल्ड हे रेस्टॉरंट आहे.
एप्रिल 2017मध्ये जडेजाने रिवा सोलंकीसह लग्न केले. तिने इंजिनिअरिंग केले आहे. तसेच लग्नाच्या दिवशी त्याच्या सासऱ्याने त्याला ऑडी क्यू7 कार भेट दिली. सन 2013मध्ये वनडे क्रमवारीत जडेजा हा अव्वल क्रमांकावर होता. अनिल कुंबळेनंतर तो पहिला क्रिकेटपटू जो गोलंदाजाच्या वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला होता. तसेच कपिल देव, महिंदर सिंग आणि कुंबळेनंतर वनडे क्रमवारीत अव्वल येणारा तो चौथा भारतीय गोलंदाज होता. या शिवाय, 2021मध्ये तो कसोटी गोलंदाजी क्रमवारीतही अव्वल क्रमांकावर होता. तसेच तो अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीतही अव्वल क्रमांकावर होता.
Indian Allrounder Cricket Player Ravindra Jadeja Life Journey