नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स या एकेकाळी सरकारच्या अखत्यारित असलेल्या कंपन्या होत्या, तसेच गेल्या काही वर्षात भारतात गो फर्स्ट, स्पाईस जेट, विस्तारा, सहारा यासारख्या अनेक खासगी विमान कंपन्यांचा विस्तार झाला, परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या संकटामुळे अनेक खासगी विमान कंपन्या दिवाळीखोरीत गेल्या असून अद्यापही त्यांची स्थिती सुधारलेली नाही. आता आणखी एक कंपनी खासगी विमान कंपनी दिवाळखोरी जाणार आहे. त्यामुळे भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
देशभरातील विमान वाहतूक क्षेत्रावर संकटाची मालिका वाढतच आहे. गो फर्स्टनंतर स्पाईसजेट विमान कंपनीच्या अडचणीही वाढत आहेत. गो फर्स्ट पाठोपाठ स्पाईसजेट ही विमान कंपनी आता दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. या विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार आहे. नॅशनल लॉ ट्रिब्युनल पुढील आठवड्यात स्पाईसजेट कंपनीच्या कर्जदात्याने दाखल केलेल्या दिवाळखोरी याचिकेवर सुनावणी घेणार आहे. विमान इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने स्पाइसजेटची आर्थिक स्थिती अतिशय घटली आहे. या विमान कंपनीला कठीण स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे कंपनीची आर्थिक स्थिती आधीच बिकट झाली आहे.
स्पाईसजेट विरोधातील दिवाळखोरीच्या याचिकेवर एनसीएलटीमध्ये ८ मे रोजी सुनावणी होणार आहे. लो कॉस्ट एअरलाईन्स सेवा देणारी विमान कंपनी स्पाईसजेटला कर्ज देणारी कंपनी एअरक्राफ्ट लेसर एअरकॅसल (आयर्लंड) लिमिटेडनं दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी एनसीएलटीकडे अर्ज दाखल केला आहे.
दुसरीकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील गो फर्स्टवर बँकांचे एकूण ६५२० कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे वाडिया ग्रुपची कंपनी गो फर्स्ट मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. रोख निधीची कमरतता आणि इंजिन पुरवठ्याचा तुटवड्यामुळे विमान कंपनीने पुढील दोन दिवस सर्व नियोजित उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीने एनसीएलटीमध्ये दिवाळखोरीसाठी अर्जही दाखल केला आहे. या प्रकरणी सुनावणीनंतर एनसीएलटीने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यावर, स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, या घटनाक्रमाचा एअरलाईन्सच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. एका निवेदनात प्रवक्त्यानं आशा व्यक्त केली की, हा मुद्दा न्यायालयाबाहेर सोडवला जाईल. यासोबतच ते म्हणाले की, सध्या या कर्जदात्याचं कोणतंही विमान एअरलाईन्सच्या ताफ्यात समाविष्ट नाही. या विमान लीजिंग फर्मची सर्व विमाने आधीच परत केली गेली आहेत.
Indian Airline Crisis Service Private Company NCLT