इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय हवाई दलाचे आश्चर्यकारक पराक्रम आपल्याला विविध घटनांमधून पाहायला मिळतात. अशाच एका घटनेत हवाईदलाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. कर्नाटकमध्ये हवाईदलाने एका धाडसी ऑपरेशनमध्ये नंदी हिल्समध्ये ३०० फूट खोल दरीत फसलेल्या एका १९ वर्षांच्या विद्यार्थ्याला वाचवले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
एनआयए वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एका धाडसी अभियानात भारतीय हवाईदल आणि चिक्कबल्लापूर पोलिसांनी एका १९ वर्षांच्या विद्यार्थ्याचा जीव वाचवला आहे. हा विद्यार्थी एका उंच कडेच्या ३०० फूट खोल नंदी हिलवर पडला होता. एनआयने हवाईदलाच्या बचावकार्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आयएफ हेलिकॉप्टर विद्यार्थी जिथे फसला होता, तिथे घिरट्या मारताना दिसत आहे. हवाईदलाच्या अथक प्रयत्नांनंतर विद्यार्थ्याला हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित बाहेर काढण्यास यश मिळाले. हा विद्यार्थी अशा परिस्थितीत तेथे कसा फसला याबद्दल माहिती मिळू शकली नाही. केरळमध्येसुद्धा अशाच एका घटनेत हवाईदलाने अशी कामगिरी केली होती. पलक्कड येथे एका टेकडीच्या कपारीत बाबू नावाच्या एका फसलेल्या गिर्यारोहकाला ४५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाचवण्यात यश मिळाले होते. भारतीय लष्कर, नौदल आणि एनडीआरएफच्या पथकाने मोहीम चालवली होती.
पहा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1495437126904979456?s=20&t=sekheehgIZtivVoR4h_w9g