पुणे – भारतीय हवाई दलात सेवा करण्याची इच्छा असणार्या युवकांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय हवाई दलाने ग्रुप सी सिव्हिलियन पदांसाठी भरतीची अधिसूचना काढली आहे. एलडीसी, एमटीएस, कूक, फायरमन आणि ड्रायव्हरसह अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार असून, त्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
नियुक्ती झालेल्या उमेदवारांची उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे नेमणूक होणार आहे. या भरतीची जाहिरात रोजगार समाचारमध्ये ३० ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ नोव्हेंबर २०२१ आहे. या भरतीमध्ये हवाई दलात एलडीसीचे १ पद आणि एमटीएसचे ३ पदे रिक्त आहेत. तर मुख्यालय पूर्व हवाई दलात सीएमटीडी (ओजी) चे २ पदे, अधीक्षक (भांडारपाल)चे १ पद आणि एलडीसीचे २ पदे रिक्त आहेत. दक्षिण पश्चिम मुख्यालयात कूकचे एक पद रिक्त आहे. प्रशिक्षण विभागात सीएडीटी (ओजी) चे १३ पदे रिक्त आहेत.
पश्चिम मुख्यालयात एमटीएसचे १ पद, कूक १ पद आणि एलडीसीची २ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये सीएटीडी (ओजी)चे पाच पद आणि एसकेचे एक पद रिक्त आहे. मुख्यालयातील देखरेखीसाठी एलडीसीची ४ पदे, सीएमटीडी (ओजी)ची २५ पदे, एमटीएसचे १४ पदे, फायरमनचे एक पद आणि कूकची ३ पदे रिक्त आहेत.