निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुकत्याच इटली येथे पार पडलेल्या आणि अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथील व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या विलास सानप यांनी आयर्नमॅन हा प्रतिष्ठेचा ‘किताब पटकाविला आहे.
विलास सानप यांनी ही अतिशय अवघड मानली जाणारी स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण केली. या स्पर्धेचे स्वरूप अत्यंत कठीण असते. यामध्ये ३.८ कि.मी. समुद्र पोहणे, त्यानंतर लगेच १८० कि.मी. सायकल चालविणे व त्यापाठोपाठ लगेचच ४२.२ कि.मी. धावणे या सर्व गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व एकूण २२६ कि. मी. अंतर विक्रमी १४ तास ४५ मिनिट ५७ सेकंद अशा विक्रमी वेळेत सानप यांनी पूर्ण केले.
सातासमुद्रा पलीकडे आयर्मन ‘किताब मिळवून सानप यांनी भारत देशाचा झेंडा अभिमानाने फडकविला त्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
Vilas Sanap, an architect from Sonewadi in Niphad taluka, became an Ironman