मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात गणरायाचे उत्साहात आगमन होत असताना नाशिकच्या मनमाडमध्ये धावत्या रेल्वेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या २७ वर्षापासून प्रवासी संघटना व गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे पासधारक बोगीमध्ये वाजत गाजत उत्साहात गणपतीची स्थापना करण्यात येते.
या उत्सवासाठी पास बोगीमध्ये विशेष सजावट करण्यात आली होती. तसेच रेल्वे सुरक्षेबाबत यावेळी संदेशही देणारे पोस्टर चिटकविण्यात आले. पुढील दहा दिवस गणरायाची रेल्वेवारी होणार आहे.
यावेळी चाकरमान्यांसह आमदार सुहास कांदे यांनीही बँडच्या तालावर ठेका धरला.राज्यावरील दुष्काळ दूर व्हावा असे साकडे आ.कांदे यांनी गणरायांना घातले.
Lord Ganesha in Manmadla Godavari Express