नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत कॅफेटेरिया येथे भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या सर्व नेत्यांनी एकत्रित फोटो काढला. त्यानंतर हा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडिायवर शेअर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चेला सुध्दा उधान आले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरवर फोटो शेअर करतांना आपल्या भावना व्यक्त करतांना म्हटले आहे की, नवीन संसद भवनातील ऊर्जा दिवस ! राज्यसभेचं चेंबर हे एक चमत्कार आहे. हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्याने तो आणखीनच खास बनला. कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतला. खरोखरच लक्षात राहावा असा आजचा दिवस.
खरं तर राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडे अधिकृत पक्ष कोणाचा यावर वाद सुरु आहे. पण, राष्ट्रवादीत दोन्ही गटाचे नेते एकमेकांना भेटले तर त्यांच्यात वाद नाही असेच चित्र दिसते. त्यामुळे अनेकांना शंका सु्ध्दा येतात. शरद पवार यांनी फुटीर नेत्यांच्या मतदार संघात जाऊन सभा घेणे हा एवढाच विरोध दिसून आला. पण, शरद पवार – अजित पवार भेट असो, तटकरे – जयंत पाटील भेट असो यात कोठेही वाद दिसला नाही. आजही भेटही अशीच आहे. त्यामुले राजकीय चर्चेतला उधान आले आहे.
Meeting of Sharad Pawar and Praful Patel in Delhi