मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव सुरू असला तरी राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातील दुष्काळाचे सावट दूर करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त कर असे साकडे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गणरायाला घातले. आज मंत्री छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधत होते.
अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे यानिमित्ताने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शिवकालीन इतिहासाचा देखावा साकारण्यात आला आहे. पुढील पिढीला इतिहासाची माहिती मिळावी शिवाजी महाराज यांच्यासोबत असलेले मावळे त्यांची माहिती आणि खरी शिवकालीन शस्त्रे आणि त्यांच्या प्रदर्शनाचा देखावा याठिकाणी साकारण्यात आला असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली….
यावेळी ते म्हणाले की आमचे लहानपण हे या माझगाव मध्ये गेले अनेक वर्ष आम्ही या मंडळाच्या माध्यमातून जन जागृतीची काम करत आहोत. या देखाव्यांच्या माध्यमातून समाजात जागृती व्हावी हा या मागचा हेतू आहे. माझगाव मधले हे गणेश मंडळ सर्वात जुन्या मंडळांपैकी एक मंडळ आहे. लालबागच्या राजाच्या मूर्तीची संकल्पना देखील या मंडळाच्या माध्यमातूनच घेण्यात आली होती अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेऊन पुढील पिढीसाठी हा एक देखावा साकारला आहे. पाहता पाहता या मंडळाला 75 वर्ष पूर्ण झाली याचा आम्हा सर्वांनाच आनंद आहे
सर्वदूर आनंदाचा शिधा पोहचला
राज्यातील नागरिकांची सर्व सन हे आनंदाने जावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचला असून. त्याचे वितरण देखील 90 ते 95 टक्के पूर्ण झालेले आहे.
indiadarpanlve