मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बजाज ऑटो बजाज १०० सीसी सेग्मेंटमध्ये एक सीएनजी बाईक आणणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सीएनजी वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) कमी करुन १८ टक्के करण्याची विनंती केल्यांतर या चर्चने जोर पकडला आहे.
या सीनजी बाईक बरोबरच बजाज चेतक श्रेणीचा विस्तार करण्यावर देखील काम करत आहे, कारण नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे प्रकार सणासुदीनंतर सादर केली जाऊ शकते. या सणासुदीच्या हंगामात बजाज चेतकच्या १०,००० युनिट्सचे उत्पादन करेल अशी अपेक्षा आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, बजाज चेतकचे उत्पादन दरमहा १५ हजार ते २० हजार युनिट्सपर्यंत वाढवले जाईल.
याअगोदर सीएनीज कारने चांगलाची चर्चेत ठरली. त्यानंतर अनेक ठिकाणी या कार दिसू लागल्या. पेट्रोलच्या किंमती वाढत असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून इेलक्ट्रीक वाहनांचे प्रमाण वाढले. त्यात आता सीएनजीची चर्चा सुरु झाल्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे आहे.