मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निवास स्थानी श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली. याप्रसंगी सहपत्नीक कुटूंबासह पूजा करण्यात आली. यावेळी श्री गणेशाचे सर्वत्र ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले.
यावेळी मंत्री भुसे यांनी बाप्पाच्या चरणी साकडे घालताना महाराष्ट्र सह जिल्हयात चांगला पाऊस पडू दे,शेतकरी राजा सुखी होऊ दे,राज्यावरील दुष्काळी संकट दूर होऊ दे व सर्वाना सुखी समाधानी व आरोग्यदायी आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना केली.
यावेळी पालकमंत्री भुसे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस उत्साहाचा असून विघ्नहर्ता गणरायाचे सर्वत्र आगमन झाले आहे. गेल्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला होता. यावर्षीदेखील गणेशोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले.