नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “आमच्या पप्पांनी गणपती आणला” हे गीत सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहे व त्यावर अभिनय करणाऱ्या साईनाथ केंद्रे या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे व शंकरपार्वतीसह श्रीगणेश असे याप्रसंगी शालेय फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून फलक रेखाटन करून चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील शाळेतील कलाशिक्षक देव हिरे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
या फलालेखनाबाबत हिरे यांनी सांगितले की, गणपती ही बुद्धीची देवता असून प्रत्येक कार्यारंभी त्यांचे प्रथम पूजन करण्याची प्रथा आहे. प्रत्येक हिंदुरुदयात बाप्पांप्रती आदराची भावना विराजमान आहे. हिंदू धर्मीयांची आराध्य देवता श्रीगणेशाचे आगमन होत आहे. घरोघरी व मनोमनी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना होत आहे. १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती श्री गणराजाचे आगमनाने सर्वत्र उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच बाप्पांच्या स्वागतास उत्सुक आहेत. त्यामुळे मी सुध्दा आगळे वेगळे स्वागत कलेतून केले आहे.