नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी चर्चेत सहभाग घेत या विधेयकाला काँग्रेसचा पाठींबा असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करण्याची मागणी केली. यावेळी त्या म्हणाल्या की, महिला आरक्षण हे राजीव गांधींचे स्वप्न होते. सोनीया गांधी आता लोकसभेत चर्चेत फारशा बोलत नाही. पण, महिला विधेयासाठी त्यांनी आज काँग्रेसकडून बाजू मांडली.
यावेळी त्या म्हणाल्या की, भारतीय स्त्री अत्यंत सक्षम असून महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी आहे. महिला आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करा नाहीतर एससी आणि एसटींची संख्या कशी कळणार ? तसेच लवकरात सवकर आरक्षण लागू करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
या भाषणात त्यांनी भारतीय महिलांनी सर्वांच्या कल्याणासाठी काम केले आहे. स्त्रीच्या सहनशीलतेचा अंदाज लावणे खूप कठीण काम आहे. भारतीय महिलांनी कधीही तक्रार केलेली नाही. महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी आहे. लवकरात सवकर आरक्षण लागू करावे.आज सकाळपासून महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही सभागृहांमध्ये आजच हे विधेयक मंजूर करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे.
Congress supports women’s reservation