नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संवत्सरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. X अर्थात ट्विटरवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, “संवत्सरी क्षमाशीलता आणि एकतेची ताकद अधोरेखित करते. आपले मतभेद दूर ठेवू आणि अनुकंपा व एकतेने दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करू. मिच्छामी दुक्कडम!”
काल नव्या संसदेत लोकसभेत पहिले भाषण करतांना पंतप्रधान मोदी यांनी आज संवत्सरी पर्व अर्थात क्षमाशीलतेचा सण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कळत नकळत कुणी दुखावले गेले असेल तर क्षमायाचना करण्याचा आजचा दिवस आहे, असे ते म्हणाले. मिच्छामी दुक्कडम असे म्हणून या सणाच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आणि गतकाळातील कटूता मागे सोडून पुढे जाण्याचे आवाहन केले.
PM greets people on the occasion of Samvatsari