नाशिक : नाशिक जिल्हा, पशुसंवर्धन विभागातील परिचर पदावर असणाऱ्या २७ कर्मचाऱ्यांना व्रणोपचारक पदी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पदोन्नती प्रक्रिया पार पडली. दिव्यांग कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांना समुपदेशनावेळी प्राधान्य देण्यात आले. समुपदेशनाने पारदर्शक रितीने पदोन्नती प्रक्रिया पार पाडल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. परिचर पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ दिल्याने त्यांनी या बाबत समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम १९६७ मधिल परिशिष्ट १२ अ.क्र. (७) नुसार परिचर (गट ड) यांना व्रणोपचारक (गट ड) या पदावर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मैट्रिक्स मधील वेतन स्तर एस-३, रूपये १६६०० ५२४००) मध्ये तात्पुरत्या स्वरूपात दिनांक १५/०९/२०२३ अन्वये पदोन्नतीने एकुण २७ कर्मचान्यांना परिचर (गट ड) यांना व्रणोपचारक (गट ड) या पदावर आदेश मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून मंजुर करून निर्गमित करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) श्री. रवींद्र परदेशी जिल्हा समान कल्याण अधिकारी श्री. योगेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रशासन अधिकारी वृषाली पाटक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी हेमंत मंडलिक, कनिष्ठ सहाय्यक ज्ञानेश्वर पवार यांनी मेहेनत घेतली.
Promotion of 27 employees in this department of Nashik Zilla Parishad