इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंदूरच्या विजयनगरचा एक व्हिडिओ सध्या चांगलाचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी बँग व झोमॅटोचा टी-शर्ट परिधान दुचाकी चालवत आहे. या व्हिडिओवरुन एकाने हा व्हिडिओ शेअर करुन इंदूर झोमॅटो विपणन प्रमुखाला ही कल्पना होती. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास रिकाम्या झोमॅटो बॅगसह फिरण्यासाठी त्याने एक मॉडेल भाड्याने घेतल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपेंद्र गोयल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अहो ! आमचा याच्याशी अजिबात संबंध नव्हता. आम्ही हेल्मेट-लेस बाइकिंगला मान्यता देत नाही. तसेच, आमच्याकडे “इंदूर मार्केटिंग हेड” नाही. हे आमच्या ब्रँडवर कोणीतरी “फ्री-राइडिंग” असल्याचे दिसते. असे म्हटल्यावर, महिलांनी अन्न वितरण करण्यात काहीही चूक नाही – आमच्याकडे शेकडो स्त्रिया आहेत ज्या त्यांच्या कुटुंबासाठी उपजीविका करण्यासाठी दररोज अन्न वितरीत करतात आणि आम्हाला त्यांच्या कार्य नीतिचा अभिमान आहे.
हा खुलासा झाल्यानंतर मात्र सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुरुच आहे. त्यामुळे त्यातून काहींचे मनोरंजन होत आहे. विशेष म्हणजे यातून मात्र झोमॅटोची जाहीरात होत आहे.
Zomato t-shirt and Bagwali girl’s video is going viral…