इंडिया दर्पण वृत्तसेवा
कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. येवल्यात एका खासगी कामासाठी आलेले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सणासुदीच्या काळात लिलाव बंद ठेवणे योग्य नाही. येत्या २६ तारखेला व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते, मात्र लिलाव बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईसाठी पणन आयुक्त, सहकार आयुक्त तसेच नाशिक जिल्हाधिकारी यांना तशा सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिल्यामुळे आज कोट्यवधींचे व्यवहार आज ठप्प झाले. जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्यांवर चर्चा करत नाही, तोपर्यंत बाजार समित्या बंदच राहतील असा इशारा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने केंद्र सरकारला दिला. त्यानंतर जिल्हयातील लासलगावसह १७ बाजार समितीमध्ये कांदा लिलावात आजपासून व्यापारी सहभागी झाले नाही. त्यामुळे आज सकाळपासून बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे.
त्यामुळे कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. येत्या २६ तारखेला व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते असेही ते म्हणाले. पण, दुसरीकडे या बेमुदत संपाबाबत बोलतांना व्यापा-यांनी सांगितले की, सरकारने दिलेलं आश्वासन अद्यापही पाळलेलं नाही. या प्रश्नावर तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून व्यापारी वर्ग दयनीय अवस्थेत असून मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांना पत्रव्यवहार केला असून त्यांनी चर्चा करावी, अन्यथा आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत असे त्यांनी सांगितले.
Action will be taken against traders who stop onion auction