येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणामध्ये सोमवारी मराठा आरक्षण प्रश्नावर संपूर्ण राज्यात रान पेटविणारे मनोज जरांगे-पाटील यांची विराट सभा सोमवारी होणार आहे. राज्याचे जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदार संघात ही सभा होणार असल्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर येथील सभेत जरांगे – पाटील यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करत भुजबळसाहेब, आम्हांला डिवचू नका, अशा शब्दात संताप व्यक्त केला होता. त्यानंतर भुजबळांनी सुध्दा नाशिकमध्ये त्यावर प्रतिक्रिया दिली होती. पण, आज येवल्यातच होणा-या या सभेत जरांगे – पाटील भुजबळांबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेची वेळ सकाळी ठीक ९ वाजता आहे. महत्त्वाचे म्हणजे ठरल्याप्रमाणे सभा वेळेत सुरू होणार आहे. म्हणून ही सभा प्रचंड मोठी व यशस्वी होण्यासाठी समाजाने मोठ्या ताकतीने कामाला लागा असे आदेश समाजाच्या वतीने तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी दिले आहेत.
तसेच या नियोजन बैठकीमध्ये सभेसाठी महत्त्वाची आयोजक समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्वानुमते ही समिती तालुक्यामध्ये सभा यशस्वी होण्यासाठी काम करत आहे. या समितीच्या माध्यमातून सभेचे सर्व आयोजन करण्यात आले आहे. मंडप साउंड सिस्टिम बोर्ड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पार्किंग व्यवस्था फिरते शौचालय आसन व्यवस्था या सर्वांची व्यवस्था या कमिटी मधील स्वयंसेवक करणार आहे. तसेच या सभेसाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे या समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष आहे.
ठिकठिकाणी होर्डिंग
या सभेसाठी येवला तालुक्यातील प्रत्येक गावातील सकल मराठा समाज एकटवला असून सोमवारच्या सभेच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहे. सभेची जोरदार तयारी सुरू आहे.
सभेसाठी वाहनांचे पार्किंगचे असे आहे नियोजन..
- नाशिक मार्गे येणाऱ्यांसाठी..जनता कॉलेज गौ शाळा मैदान..
- लासलगाव पाटोदा मार्गे येणाऱ्यांसाठी. पशू वैद्यकीय दवाखाना
- मनमाड मार्गे येणाऱ्यांसाठी. संतोषी माता मंदिर शेजारील प्रांगण.
- अंदरसुल कोपरगाव मार्गे येणाऱ्यांसाठी.स्वामी मुक्तनंद कॉलेज प्रांगण.
- मोटार सायकल साठी सहारा हॉटेल समोरील प्रांगण.
In yeola Manoj Jarange-Patil sabaha on Monday