येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील भिंगारे परिसरात अन्नाच्या शोधात फिरणारा नर जातीचा एक बिबट्या पिंज-यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दुस-या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी शेतक-यांना दोन बिबटे शेतांमध्ये दिसल्याने परिसरातील नागरीकांमध्ये दहशत पसरली होती. त्यामुळे वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अन्नाच्या शोधात फिरणारा नर जातीचा एक बिबट्या पिंज-यात जेरबंद झाला.
या बिबट्याबरोबरच दुसरा बिबट्या सुध्दा असून त्याल पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे. हा बिबट्या जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण राहणार आहे.
Forest department succeeded in imprisoning a leopard in Yevla taluka, but another one disappeared