येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कोटमगाव येथील जगदंबा यात्रेत मंदीराच्या मागील बाजूस एका भाविकांनी बाहेर दुचाकी पार्क केलेली होती. या दुचाकीच्या सीटमध्ये एका सर्प घुसला. त्यावेळेस येथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिस व होमगार्डला ही गोष्ट लक्षात आली.
त्यानंतर त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी तातडीने येवल्यातील सर्प मित्र दिपक सोनवणे यांना या ठिकाणी पाठवले. त्यानंतर सर्पमित्राच्या प्रयत्नानंतर दुचाकीमध्ये घुसलेल्या नागाचे रेक्यु करत त्याला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर सर्प मित्र दीपक सोनवणे याने नागाला जेरबंद करत निर्जन स्थळी सोडले. या घटनेमुळे परिसरात दुचाकी लावणा-या मध्ये सापाची भीती तयारी झाल्याचे चित्र होते…
A snake entered the seat of a two-wheeler during a Yatra to Kotamgaon