इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
येवला- येथील मनोज जरांगे – पाटील यांच्या सभेसाठी फुलांचा वर्षाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या एका जेसीबी मधून ४ कार्यकर्ते खाली पडल्याने एक जण किरकोळ जखमी झाला तर एकाची तब्बेत जास्त गंभीर झाली आहे. त्यांच्यावर येवला येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत असून एका गंभीर जखमीला कोपरगाव येथे हलविण्यात आले आहे.
आज येवलल्यात सकाळी जरांगे पाटील यांची जाहीर सभा होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पहिल्यांदाच ते येवल्यात येत असल्यामुळे त्यांचे जोरदार स्वागत करण्याची तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी पोस्टर्सही लावण्यात आले होते. आज काही जणांनी त्यांच्या स्वागतासाठी जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यासाठी तयारी केली. त्यावेळेस ही घटना घडली.
While showering flowers from JCB to welcome Jarange-Patil, 4 workers fell down, one critically.