इंडिया दर्पण वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर भुजबळ पुन्हा मुंबईतून निवडणूक लढवणार अशी राजकीय चर्चा रंगलेली असतांना या चर्चेवर येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांनीच उत्तर दिले.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांनी निवड करण्यात आली. त्यामुळे भुजबळांचे पुन्हा आपल्या पूर्वीच्या मतदार संघावर लक्ष आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर भुजबळ यांनी नाशिक व मुंबई दोन्हीकडे लक्ष राहणार असल्याचे सूचक विधान केले. पण, निवडणुकीबाबत ते काय बोलले ते व्हिडिओमध्ये बघा.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे काम व प्रसार करण्याचे काम करावे लागणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात भुजबळ गमावलेला मतदार संघ पुन्हा ताब्यात घेणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. पण, त्याला भुजबळांनीच उत्तर दिले.