येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सकल मराठा समाजा तर्फे आज येवला शहरात बंद पाळण्यात आला. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सर्व मराठा समाजाला कुणबी घोषित करण्यात यावे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जे मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांचे चार्जशीट दाखल करण्यात येऊ नये. मुंबई येथील अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम पुर्ण करावे या सह विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला.
या बंदमध्ये सकाळ पासून येवल्यातील सर्व दुकान, प्रतिष्ठाण बंद असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
Strict shutdown in Yewla today: Streets in the city have been flooded since morning