नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गहू आणि पीठाच्या किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केन्द्र सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) खुल्या बाजार विक्री योजने (स्थानिक) अंतर्गत साप्ताहिक ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री करत आहे. गव्हाच्या सध्याच्या हमीभावाच्या दराने म्हणजेच २१२५ रुपये प्रति क्विंटल या राखीव दराने केंद्राने गहू उपलब्ध केला आहे.
देशभरातील ४८० हून अधिक गोदामातून प्रत्येक साप्ताहिक लिलावात २.०० लाख मेट्रिक टन गहू उपलब्ध केला जात आहे. २०२३-२४ या वर्षात २१ सप्टेंबर पर्यंत एकूण १३ ई-लिलाव झाले आहेत. यात १८.०९ लाख मेट्रिक टन गव्हाची या योजने अंतर्गत विक्री झाली आहे.
ऑगस्ट २३ मध्ये गव्हाची सरासरी विक्री किंमत २२५४.७१ रुपये प्रति क्विंटल होती. २० सप्टेंबरच्या ई-लिलावात ती कमी होऊन २१६३.४७ रुपये प्रति क्विंटल झाली. खुल्या बाजारात गव्हाचे बाजारभाव थंडावल्याचे गव्हाच्या सरासरी विक्री किमतीतील घसरणीचा कल सूचित करतो. प्रत्येक साप्ताहिक ई-लिलावात, उपलब्ध केलेल्या गव्हाच्या तुलनेत विक्रीचे प्रमाण ९० टक्के च्या पुढे नाही. देशभरात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे याचेच हे निदर्शक आहे.
ओएमएसएस (डी) धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे खुल्या बाजारात गव्हाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या गेल्या आहेत.२०२३-२४ च्या उर्वरित कालावधीसाठी ओएमएसएस (डी) धोरण चालू ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
The central government has sold 1 lakh metric tons of wheat in the open market