इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – लोकांच्या जगण्याचा अविभाज्य घटक झालेला व्हॉट्सअॅप बंद होणार ही बातमी पुढे आली आहे. या बातमीमुळे अनेकांना धडकी भरलेली आहे. परंतु, व्हॉट्सअॅपने हा निर्णय काही विशिष्ट्य मॉडेल्ससाठीच घेतला आहे. काही जुन्या मोबाईलवर यापुढे व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मार्केटमध्ये दिवाळीच्या अनेक ऑफर्स आता सुरू होती. विशेषतः मोबाईल कंपन्या मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देतात. अशात ज्यांना जुने मॉडेल बदलून नवीन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी हीच वेळ असेल. कारण २४ ऑक्टोबरनंतर जुन्या मॉडेल्सवर व्हॉट्सअॅप चालणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. ऑपरेटिंग सिस्टीमच्या नवीन व्हर्जनवर नवीन फिचर सुरू करण्याचा निर्णय व्हॉट्सअॅपने घेतला आहे. सॅमसंग गॅलक्सी एस२, नेक्सस ७, आयफोन ५, आयफोन ५सी, मोटोरोला झूम, सॅमसंग गॅलक्सी टॅब १०.१, सॅमसंग गॅलक्सी नेक्सस, सोनी एरिक्सन एक्स्पेरिया आर्क३, एलजी अॉप्टीमस २एक्स, एचटीसी डिझायर एचडी, सॅमसंग गॅलक्सी एस यासह आणखी काही मॉडेल्सवर यापुढे व्हॉट्सअॅप चालणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या मोबाईल्सवर व्हॉट्सअॅप बंद करण्यापूर्वी कंपनीतर्फे नोटिफिकेशन दिले जाईल. त्यानंतर डिव्हाईस अपग्रेड करावे लागेल किंवा दुसरा मोबाईल घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट करायचे असेल तर आत्ताच तपासून घ्यावे लागणार आहे. नवीन व्हर्जन अपडेट करून घेतले तरच व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.
लोक जुने सॉफ्टवेअर वापरत असतील तर..
दरवर्षी व्हॉट्सअॅप कंपनीकडून सॉफ्टवेअरचे कोणते व्हर्जन सध्या वापरले जात आहे आणि कोणते व्हर्जन जुने आहे, हे तपासून घेतले जाते. त्यानंतर कंपनी नवीन फिचर्स अपडेट करण्याचा निर्णय घेत असते, असे कंपनीकडून सांगितले जाते.
So your WhatsApp will be closed before Diwali