मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत आज सकाळपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी सुरु झाली. या सुनावणीत शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी करत दोन आठवड्यांची मुदत मागितली. मात्र अध्यक्षांनी दोन्ही गटांना एक आठवड्याचा अवधी दिला. त्यामुळे ही सुनावणी आता एक आठवडा लांबणीवर गेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे कोणते आमदार पात्र आणि कोणते अपात्र याचा निर्णय या निर्णय आता एक आठवड्यानंतर होणार आहे.
या सुनावणीसाठी विधानसभवनाच्या सेंट्रल हॅालमध्ये शिंदे गटाचे २१ तर ठाकरे गटाचे १४ आमदार उपस्थित होते. सर्व याचिका स्वतंत्र आहेत, त्यामुळे या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी होईल, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी दरम्यान सांगितले. शिंदे गटाकडून निहार ठाकरे तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.
या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे या याचिकेवर युक्तिवाद सुरु असतांना शिंदे गटाकडून याचिकेची कागदपत्रे प्राप्त न झाल्याने बाजू माडंण्यात अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन आठवड्यांचा वेळ द्यावा अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांनी कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि त्यावर लेखी उत्तर देण्यासाठी दोन्ही गटांना एक आठवड्याचा वेळ दिला. या सुनावणीत २२ याचिकेवर आज चर्चा झाली.
The decision of eligible and ineligible MLAs of Shiv Sena has been postponed for a week