इंडिया दर्पण डेस्क
बलात्काराच्या आरोपाखाली साडेसात वर्षे तुरुंगवास भोगवल्यानंतर एका व्यक्तीला डीएनए चाचणीच्या पुराव्यामुळे ४७ वर्षांनंतर चुकीच्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले. ही घटना अमेरिकेतील असून दोषमुक्तीचा हा ऐतिहासिक खटला समजला जातो. त्यावेळेस डीएनए करता येत नव्हते. त्यामुळे त्याला चुकीची शिक्षा भोगावी लागली. लिओनार्ड मॅक असे या व्यक्तीचे नाव असून तो आता ७२ वर्षांचा आहे.
१९७५ साली लिओनार्ड मॅकला न्यूयॉर्क राज्यातील ग्रीनबर्ग येथे एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ती दुसऱ्या मुलीसोबत शाळेतून घरी जात असताना बलात्काराची घटना घडल्याचा आरोप होता. लिओनार्ड मॅक हा आफ्रिकन अमेरिकन आहे. बलात्काराची ही घटना घडल्यानंतर पोलिसांना एका काळ्या माणसावर संशय आला जो बहुतेक गोर्या शेजाऱ्यांसोबत राहत होता आणि लिओनार्ड मॅकला अटक झाली होती.
ही अमेरिकन इतिहासातील सर्वात प्रदीर्घ चुकीची शिक्षा असल्याचे नोंदवले गेले आहे. दुसरीकडे, नॅशनल रजिस्ट्री ऑफ एक्सोनरेशननुसार १९८९ पासून ५७५ चुकीच्या पद्धतीने दोषी ठरलेल्या लोकांना नवीन डीएनए चाचणीच्या आधारे निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. त्यापैकी ३५ जण फाशीच्या प्रतीक्षेत होते. संशोधकांचे म्हणणे आहे.
काय आहे डीएनए चाचणी
डीएनएचा फुलफॅार्म deoxyribonucleic acid असा होतो. डीएनए टेस्टला अनुवांशिक चाचणी (genetic test) असे देखील म्हटले जाते. ही चाचणी केल्याने भरपुर अनुवांशिक माहीती प्राप्त होत असते. डीएन ए हा अनुवांशिक रीत्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतो.
Historical trial; Jailed for seven and a half years on charges of rape,