नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 1863 मध्ये, देबेंद्रनाथ टागोर यांनी २० एकर जमीन कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर घेतली, ज्यामध्ये दोन छातिम (अल्स्टोनिया स्कॉलिस) झाडे होती. ही जमीन वार्षिक ५ रुपये दराने, भुवन मोहन सिन्हा या रायपूर, बीरभूमचे तालुकदार यांच्याकडून घेतली होती. त्यांनी तेथे एक अतिथीगृह बांधले आणि त्याचे नाव शांतीनिकेतन (शांतीचे निवासस्थान) ठेवले. हळूहळू हा संपूर्ण परिसर शांतीनिकेतन म्हणून ओळखला जाऊ लागला.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शांतिनिकेतनचा समावेश झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करुन आनंद व्यक्त केला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे स्वप्न आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे मूर्त स्वरूप असलेल्या शांतिनिकेतनचा @UNESCO जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद झाला आहे. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.”
कोलकाताच्या १५२ किमी अंतरावर शांतिनिकेतन
शांतिनिकेतन हा भारताच्या पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्याचा एक परिसर आहे. बोलपूर उपविभागातील बोलपूर शहराच्या शेजारी सून, कोलकाताच्या उत्तरेस अंदाजे १५२ किमी अंतरावर आहे. याची स्थापना महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती आणि नंतर त्यांचा मुलगा रवींद्रनाथ टागोर यांनी विस्तार केला. रवींद्रनाथांनी याचे रुंपातरण करून त्याचे विश्वभारती विद्यापीठ तयार केले.
Inclusion of Santiniketan in the UNESCO World Heritage List