ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ८ महिन्याच्या मुलाचे शवविच्छेदन नको म्हणून बापाने बाळाचा मृतदेह घेऊन सर्वांना चकवा देऊन निघून गेले. या अचानक झालेल्या घटनेनंतर रुग्णालयात मोठा गोंधळ झाला. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मुलाच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या आठ महिन्याच्या बाळाला गुरूवारी रात्री १०:३० च्या दरम्यान आण्यात आले होते. रुग्णालयात त्याची डॅाक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्या वेळी निमोनिया आणि खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस दिल्याचे आढळून आले. या बाळाचा त्यानंतर उपचार सुरु करण्यात आला. पण, आज पहाटे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बाळाचा मृत्यू झाल्यानंतर डॅाक्टरांनी या बाळाच्या वडिलांना शव विच्छेदन करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर त्यांन त्यास विरोध केला.
त्यानंतर वार्डमधून बाळाचा मृतदेह घेऊन त्यांनी सर्वांना चकवा दिला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. अखेर रुग्णालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या वडिलांचा शोध घेऊन शिळ डायघर येथून बापाला ताब्यात घेतले.
त्यानंतर या बाळाचा मृतदेह कळवा रुग्णालयात आणण्यात आला. बाळाचा मृतदेह घेऊन जाण्यामागचे कारण मात्र पुढे आले नाही. विरोध का केला .हेही पुढे आले नाही. लहानशा मुलांचे शव विच्छेदन करणे ही गोष्ट खरं तर पालकांना सहन करणे अवघड आहे. हे कारण असेल तर ठीक आहे.
No autopsy of 8 month old child