इंडिया दर्पण ऑनलाईन डे्क
मेडिकल शॉपमध्ये काम करणाऱ्याच्या बँक खात्यात ७५३ कोटी, असे वाचल्यावर कुणालाही आश्चर्य बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र, असे झाले असून या प्रकाराने अनेकांना बुचकाळ्यात टाकले आहे. प्राप्त माहितीनुसार, तामीळनाडू येथील करणकोविल येथील रहिवासी असलेले मुहम्मद इद्रिस येथील हे तेनामापेठ येथील एका मेडिकल दुकानात काम करतात. ७ ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून दोन हजार रुपये पाठवले होते. यानंतर त्याने आपला बॅंक बॅलन्स चेक करण्यासाठी मोबाईल काढला अन् त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.
कारण त्याच्या खात्यात ७५३ कोटी रुपये असल्याचे मेसेजमध्ये म्हटले होते. या संपूर्ण प्रकाराने हा तरुण चांगलाच गोंधळून गेला. त्याने थेट बॅंकेत जाऊन याबाबतची माहिती दिली. खात्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचे पाहताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच ईदरीसचे बँक खाते फ्रीज केले गेले. याबाबत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक कारणामुळं चुकीच्या खात्यात रक्कम जमा झाली होती. त्यामुळं बँकेचे खाते फ्रीज करण्यात आले आहे. फक्त एसएमएसमध्येच चुकीची रक्कम दिसत आहे, बँक खात्यात नाही. ग्राहकाचे खाते बंद करण्यात आले नाहीये, आमची चूक सुधारण्याचे काम आम्ही करत आहोत.
यापूर्वी घडलीय अशी घटना
तामिळनाडूमधील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. तत्पूर्वी, चेन्नई येथील कॅब ड्रायव्हर राजकुमार यांना त्यांच्या तामिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या (टीएमबी) खात्यात नऊ हजार कोटी रुपये शिल्लक असल्याचे जाणून धक्का बसला. त्यांनी हा मुद्दा उपस्थित करताच टीएमबी बँकेने तत्काळ कारवाई केली आणि पैसे काढण्यात आले. तंजावर येथील गणेशन यांच्यासोबतही अशीच एक घटना घडली होती, जिथे त्यांच्या बँक खात्यात ७५६ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले.
Working in a medical shop… Suddenly 753 crores came into the account.