इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : एकेकाळी मुंबईत गुंड स्मगलर्स आणि खंडणी बहाद्दर यांचे राज्य होते. मात्र मुंबई पोलिसांच्या कठोर कारवायांमुळे आणि एन्काऊंटरमुळे मोठ्या गुन्हेगारांचे राज्य जवळजवळ संपुष्टात आले आहे, असे म्हटले जाते. मात्र तरीही काही गुन्हेगार पुन्हा डोके वर काढतातच, त्यातच पटेल हे नाव कुविख्यात म्हटले जाते मुंबई व गुजरातमध्ये खंडणी, खून, अपहरणाच्या प्रकरणातील आरोपी व कुख्यात गुंड सुरेश जगूभाई पटेल यांची ३ कोटी ८९ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २३ मोठ्या मालमत्तांचादेखील समावेश आहे.
अनेक गंभीर गुन्हे दाखल
सुरेश पटेल हे नाव पोलिसांनी ईडीच्या रडावरच होते, गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात गुप्तपणे चौकशी सुरू होती. अखेर सुरेश पटेल याच्याविरोधात दमण, गुजरात आणि मुंबईत अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी, खून, अपहरण, भ्रष्टाचार, अवैधरित्या शस्त्र बाळगणे असे या गुन्ह्यांचे स्वरूप आहे. दहशतीच्या माध्यमातून त्याने कोट्यवधींची माया गोळा आहे. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जून महिन्यामध्ये त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या घरावर छापेमारी केली. अनेक स्थावर मालमत्तांची खरेदी त्याने गुन्हेगारी कृत्यातून कमावलेल्या पैशांतून केली असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
ईडीचे अधिकारीही अचंबित
सुरेश पटेल यांच्या मालमत्तेवर छापा टाकला तेव्हा ईडीचे अधिकारी देखील चकित झाले, कारण सुरेश पटेल याच्या घरातून १ कोटी ३४ लाख रुपये मूल्याचे दागिने, तसेच १ कोटी ७ हजार रुपये मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तर त्याच्या बँक खात्यात असलेले २० लाख ९० हजार रुपयेदेखील जप्त केले होते. तसेच त्याच्या एका साथीदाराच्या घरातून २२ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. तसेच ईडीने केलेल्या जप्तीच्या कारवाईनंतर सुरेश पटेल याच्याकडून आतापर्यंत ६ कोटी ७३ लाख रुपयांची एकूण जप्ती झाली आहे. तर, त्याच्या आणखी मालमत्तेचा शोध ईडीचे अधिकारी घेत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे कोविख्यात गुंडांचे चांगले धाबे दणाणले आहे.
Big action of ED…Suresh Patel’s property worth 3 crores seized