शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सोलापूर शहराचा पाणी प्रश्न गंभीर; अलमट्टी धरणातून पाणीपुरवठा व्हावा यााठी जिल्हाधिकारींनी केली ही प्रत्यक्ष पाहणी

सप्टेंबर 24, 2023 | 10:29 am
in राज्य
0
unnamed 71 e1695531507842

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूर – यावर्षी पाऊस कमी झाल्याने व सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर येथील पाणीसाठा काही दिवस पुरेल एवढाच असल्याने कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा व्हावा, याबाबत ७ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली होती.

त्या अनुषंगाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यात सोलापूर शहराला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत चर्चा होईल. तत्पूर्वी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला कशा पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल याबाबत पाहणी करावी असे सूचित केले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व कर्नाटकच्या इंडी ब्रांच कॅनॉलचे उपअभियंता हिरोळे यांच्या समवेत औज नदीपासून १२ किलोमीटर असलेल्या कर्नाटकमधील हेबल नाल्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विजयपूरच्या जिल्हाधिकारी यांच्या समवेत काल फोनद्वारे चर्चा केली होती. पाहणीसाठी विजयपूर जलसंपदा विभागाचे अधिकारी त्यांनी पाठवून दिलेले होते.

कर्नाटकमधील अलमट्टी धरणाच्या इंडी कॅनॉलची नाल्याची लांबी १६० किलोमीटर आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या औज नदीपासून बारा किलोमीटर अंतरावर कर्नाटक मधील हेबल नाल्यापर्यंत अलमट्टी धरणाचे पाणी येते. या नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता ५० क्युसेक पर्यंत आहे. परंतु पूर्ण क्षमतेने या नाल्यातून पाणी सोडल्यास ते नाल्याच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊ शकते. त्यामुळे किमान २५ ते ३० क्यूसेक पाणी औज पर्यंत येऊ शकते, अशी माहिती इंडी ब्रांच कॅनॉलचे उपअभियंता हिरोळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण हेबल नाल्याची पाहणी केली. तसेच हेबल नाल्यामध्ये काही ठिकाणी झाडेझुडपे व वृक्ष मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उप अभियंता कोकरे, सेवानिवृत्त अभियंता पी. एस. केसकर, विजयपूर संपदा विभागाचे उपअभियंता शिरोळे कनिष्ठ अभियंता काटे उपस्थित होते.

अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला पाणी सोडण्याच्या अनुषंगाने आज झालेली संयुक्त पाहणी ही प्राथमिक आहे. सद्यस्थितीत आजच्या पाहणीच्या अनुषंगाने राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. तो अहवाल सादर झाल्यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये या अनुषंगाने चर्चा होऊन निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.
Water problem of Solapur city serious; The collector made this direct inspection to ensure water supply from Almatti Dam

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत सहकार चळवळीच्या भविष्यबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले मोठे विधान

Next Post

आज रंगणार भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील दुसरा सामना; या सामन्यावरही पावसाचे सावट

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
F6pMNhTbkAAeler

आज रंगणार भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील दुसरा सामना; या सामन्यावरही पावसाचे सावट

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011