इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – शेअर मार्केट एवढ्या अनपेक्षित घटना कुठेही घडत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात खेळण्यासाठी अत्यंत चाणाक्ष बुद्धी व सतर्कता हवी असते. कोणता शेअर कधी उसळेल आणि कोणता कधी कोसळेल याचा अंदाज लावता आला म्हणजे झाले. अशाच एका शेअरने अनेकांना मालामाल केले. पाच वर्षांपूर्वी १ रुपयाने सुरू झालेला शेअर आता ७५ रुपयांपर्यंत येऊन पोहोचला आहे.
सन्मित इन्फ्राचा शेअर २१ डिसेंबर २०१८ ला १.३१ रुपये होता. तो ६ अॉक्टोबर २०२३ ला ७८.६१ रुपयांवर बंद झाला. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल ५ हजार ९०० टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरचा गेल्या ५२ आठवड्यांतील निचांक ५२ रुपये आहे तर उच्चांक ९४.७४ रुपये आहे, हे विशेष. ही कंपनी बायो-मेडिकल वेस्टचे डिस्पोजल, पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचा पुरवठा आणि रिअल इस्टेट प्रॉडक्ट्सच्या कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहे. खरे तर शेअर मार्केटमध्ये कमी कालावधीत खूप रिटर्न्स देणारे फारच कमी शेअर्स असतात. सन्मित इन्फ्राने ती किमया साधली आहे. १ रुपयांचा शेअर केवळ ५ वर्षांत ७५ रुपयांवर पोहोचल्यामुळे आता सर्वांचे लक्ष या शेअरकडे वेधले गेले आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर सन्मित इन्फ्राच्या शेअरमध्ये ४४६ टक्क्यांची वृद्धी झाली असून या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास १२४० रुपये आहे.
१ लाखाचे ६० लाख
सन्मित इन्फ्राचा शेअर नोव्हेंबर २०१९ मध्ये ३ रुपयांवर होता. आज तो ७८.६१ रुपयांवर आहे. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत गुंतवणुकदारांना २५२० टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. अर्थात एखाद्या व्यक्तीने पाच वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे मूल्य आज ६० लाख रुपये झाले असेल.
This share made investors rich!