इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सातारा : फलटण शहर हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या ओळखले जाते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये शहर आणि परिसरामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आणखी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका तरुण महिलेने आपल्या पतीचा खून केला असून तिचे दुसऱ्याच एका तरुणावर प्रेम होते, मात्र पती अडथळा ठरत असल्याने तिने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कालव्यामध्ये मृतदेह टाकून दिल्याची कबूली
शहरातील शिवाजीनगरमधील अजित बुरुंगले (वय २४) हा बेपता झाला होता. याबाबत पोलीसांनी चौकशी केली, तेव्हा पत्नीच्या प्रेमप्रकरणामुळे अजित याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने अजितचा खून केला. मृतदेह अजितचा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत पत्नीची कसून चौकशी केली. चौकशीत पत्नीचे करण भोसले (रा. थेऊर रोड, पुणे) या तरूणाशी प्रेमसंबंध असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रेमसंबंधात आणि लग्न करण्यात नवरा अडथळा वाटू लागला होता. करणने त्याचा साथीदार राहुल इंगोले (वय २२ रा. वाघोली, पुणे) याची मदत घेतली. त्यानंतर करणने अजितला घरातून बोलवून त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी नीरा कालव्यामध्ये मृतदेह टाकून दिल्याची कबूली करणने दिली आहे.
खूनासाठी मदत करणारा साथीदार मात्र फरार
दरम्यान अजित घरातून बेपत्ता होता. त्याच्या घराच्या लोकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी विडणी येथील नीरा उजव्या कालव्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत अजितचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हे कटकारस्थान असल्याचे उघड झाले. त्यामुळे अजितची पत्नी आणि तिचा प्रियकराला अटक केली.दरम्यान पोलिासांनी संशयित अजितची पत्नी आणि तिचा प्रियकर करण या पोलिसांची या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली असून या दोघांना राहुल इंगोले याने मदत केली होती मात्र तो फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.
Wife killed husband over love affair…