इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्स बस व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ जण ठार तर २३ जण जखमी झाले आहे. ही ट्रव्हल्स बस नाशिकची असून बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून ती पुन्हा नाशिककडे परत येत होती. त्यावेळेस हा अपघात झाला. या ट्रव्हल्स बसने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला. हे सर्व भाविक इंदिरानगर मधील असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक येथे राहणारे ३५ भाविक खासगी टेम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. वापस येतांना समृद्धी महामार्गावर (वैजापूर) अगरसायगाव परिसरात रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान ट्रकला पाठीमागून धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. या अपघातातील सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
हा झालेला अपघात इतका भीषण होता की, यामध्ये १२ जणांचा दुदैर्वी मृत्यू झाला. त्यात एका ६ वर्षाच्या चिमुकलीचा देखील समावेश होता. तर यात अन्य २३ जण जखमी झाले. काही गंभीर जखमी अवस्थेत आहे. या जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य केले. या अपघातातील मृत्यू व जखमींची नावे अद्याप आली नाही.
दि :- 15/10/2023
हद्द :-४४४ते ५०२ लासुर IC 18 (छत्रपती संभाजीनगर)
ठिकान :- चॅनल नं.486 (मुंबई कॉरिडोर)
०५) वाहन नंबर व वाहनांचा प्रकार: 1)ट्रॅव्हल:- MH 04GP 2212
प्रवास बुलढाणा ते नाशिक
2)ट्रक :-MP 09 HH 6483
०७ )एकूण प्रवासी 35
23 जखमी खालील प्रमाने
1) दगु मसके
2) गौतम तपासे
3) कार्तिक
4)शांताबाई मस्के
5)दुर्गा
6)धनश्री सोळसे
7)लखन सोळसे
8)सोनाली त्रिभुवन
9)श्रीहरी केकाणे
10)सम्राट केकाणे
11)अनिल साबळे
12)संदेश अस्वले
13)परकाश गांगुर्ड
14)तन्मय कांबळे
15)युवराज साबळे
16)गिरतेशवरी अस्वले
छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालय
1) पुजा अस्वले
2)वैशाली अस्वले
3)ज्योती केकडे
*11) अपघाताचे कारण: *समोरील ट्रक MP 09 HH 6483 या ट्रक ला MH 04 GP 2221 ट्रॅव्हल्स ने पाठीमागुन चालू असलेल्या ट्रक ला धडक दिली म्हणुन अपघात घडुन आला*
A terrible accident involving a travel bus and a truck on Samriddhi highway… 12 people from Nashik died and 23 were seriously