इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक येथील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर एंडाईत यांनी महिला कार्यकारिणी जाहीर केली. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष कविता कर्डक, प्रदेश पदाधिकारी समाधान जेजुरकर, रवी सोनवणे, जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यांची करण्यात आली नियुक्ती
जिल्हा उपाध्यक्ष पदी किशोरी खैरणार, जिल्हा सरचिटणीसपदी कोमल निकाळे, हेमलता खैरणार, अलका धोटींग, योगिता पाटील, जिल्हा संघटकपदी द्रोपदाबाई गांगुर्डे, सिंधू शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली.
महिला शहर अध्यक्ष
दिंडोरी- शितल वाघ, पेठ- अलका कस्तुरे,कळवण- मंदाकिनी खैरणार, येवला- सीमा गायकवाड, घोटी- रुपाली बेदमूथा, देवळा- रुपाली बच्छाव, सिन्नर- जयश्री पवार, बागलाण- छाया सोनवणे निवड करण्यात आली.
महिला तालुका अध्यक्ष
दिंडोरी- अस्मिता जोंधळे, पेठ-शीतल रहाणे,कळवण-ज्योती गांगुर्डे, देवळा-सरला सोनवणे चांदवड-स्वप्नाली शेलार, नांदगाव – चंद्रकला बोरसे,इगतपुरी गीता तोकडे, निफाड पश्चिम – अश्विनी मोगल, निफाड पूर्व-मनिषा वाघ, सिन्नर – छाया शेवाळे मेघा दराडे यांची नियुक्ती करण्यात आली.