मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जी २० शिखर परिषद यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजधानी दिल्लीतील भाजपा कार्यलात पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचदिवशी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत देशातील चार जवांनाना हौतात्म्य प्राप्त झालं. यावरून ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखात टीका करण्यात आली आहे.
या अग्रलेखात म्हटले आहे, पंतप्रधान मोदी यांच्यावर दिल्लीत जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. फुलांचा वर्षाव होत असताना मोदी भाजप कार्यकर्त्यांना सुहास्य वदनाने हात वगैरे उंचावून अभिवादन करत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. मोदींवर फुलांचे सडे उधळले जात असताना जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिह्यात आपल्या जवानांच्या रक्ताचे सडे पडत होते. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी घुसले व जवानांची त्यांच्याशी चकमक झाली. त्यात भारतीय सैन्याच्या एका कर्नल आणि मेजरसह चार जांबाज अधिकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष ढोनक आणि डीएसपी हुमायून भट अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरगतीस प्राप्त झाले.
त्यानंतर निदान राजनाथ सिंहांनी तरी हे सब टायटल देत म्हटले आहे की, जम्मू-कश्मीरमधील स्थिती बरी नाही व मोदी सरकार ‘जी-२०’च्या यशाने हुरळून आणि विरघळून गेले आहे. जवान अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत असताना केंद्रीय निवडणूक समितीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. मोदींनी ‘जी-२०’चे जे अफाट यश संपादन केले, त्यामुळे त्यांच्यावर ‘धो-धो’ फुले उधळली गेली. त्या वेळी तेथे गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. कर्नल, मेजर, डीएसपीच्या मृत्यूचे सावट या नेत्यांच्या चेहऱ्यावर नव्हते. निदान राजनाथ सिंह यांनी तरी ते दुःख व्यक्त करण्याची कृती करायला हवी होती. अशी टीकाही केली आहे.
Criticism from samnna
Criticism from saamna