प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागा.
रावण जेव्हा मृत्यूची झुंज देत होता तेव्हा तो रामाला म्हणाला मी तुझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत मोठा आहे वयाने बुद्धीने आणि ताकदीने देखील, एवढं सगळं असताना मी हारलो, कारण तुझा भाऊ तुझ्या सोबत होता, तर माझा भाऊ माझ्या विरोधात होता , माझ्या भावाचा सदविवेक मी ओळखू शकलो नाही, तो मला जे काही सांगायचा प्रयत्न करत होता तेही मला उमगले नाही. मी फक्त त्याचा अपमान केला त्याचे परिणाम मी भोगत आहे,
वाचक हो कुटुंबातील एखादी व्यक्ती वयाने लहान असेल पण काही महत्त्वाचे सांगत असेल, तर तिला अपमानित करू नका, वयाने लहान व्यक्तीही विवेकाने सजग असू शकते, जगाचा अनुभव कमी असला तरी तिचा सदविवेक अधिक जागरूक असू शकतो, अशावेळी तिचे ऐकण्यास कसलाही कमीपणा नसतो हे नेहमी लक्षात असू द्या