इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अय़ोध्यातील श्रीराम मुर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा झाल्यानंतर मुर्तीचे लोभस रुप समोर आले. बालरुपातील या मुर्तीच्या सर्व जण प्रेमात पडले. काल दिवसभर या मुर्तीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात होते. काहींनी तर आपले स्टेटस ही मुर्तीच ठेवली होती. पण, आज याच मुर्तीचा एक व्हिडिओ समोर आला असून तोही प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने करण्यात आला असून त्यात रामलल्लाचा बालरुपातील फोटो जीवंत केला आहे. या तंत्रज्ञाने फोटो तोच ठेऊन व्हिडिओ तयार केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रामलल्ला गोड हसतांना दिसत आहे. तो आनंदाने आपल्या भक्तांकडे बघतो.
खरंतर ५०० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर राम मंदिर बनले याचा आनंद सर्वांना आहे. पण, या आनंदात भर टाकली ती मंदिराच्या बांधकामाने त्यानंतर मुर्तीने. ही मुर्ती इतकी लोभस आहे की सर्वजण रामलल्लाच्या मुर्तीच्या प्रेमात पडले. पण, ही मुर्ती जेव्हा जीवंत होते तेव्हा अजूनही आनंद होतो. तर मग बघा हा व्हिडिओ