इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, केवळ उत्तर प्रदेशात नव्हे तर भारतातील अनेक राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले दिसून येते. काही दिवसांपूर्वीच मुंबईत चालत्या कारमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला होता. त्याचप्रमाणे पुण्यात तरुणी आणि महिलांवर हल्ले झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. बिहार व मध्य प्रदेशात देखील महिलांवरील वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना उघडकीस आले आहेत. त्यातच उत्तर प्रदेशात चालत्या रेल्वेमध्ये एक तरुणाने महिला पोलीसावर अत्याचार केला होता, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. हा आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला सूचना देऊनही तो गुंगरा देत असल्याने अखेर त्याचा एन्काऊंटर केला.
पोलिसांनी केला होता निश्चय
उत्तरप्रदेशात धावत्या रेल्वेत महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला. अनिस रियाझ खान (वय ३०) असे एन्काउंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याला आणि त्याच्या साथीदार यांना शरण येण्याचे सांगत होते. मात्र त्याने त्या ऐकले नाही. या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि २ पोलीस कॉन्स्टेबलही जखमी झाले आहेत.याशिवाय अन्य दोन आरोपी देखील जखमी झाले. त्यांना अटक करुन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील महिन्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबल शरयू एक्स्प्रेसमध्ये जखमी अवस्थेत आढळून आली होती. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या महिलेच्या अंगावर कपडे देखील नव्हते. प्रवाशांनी तातडीने या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिला पोलिसाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होते. या घटनेमुळे पोलीस विभागात चांगला तणाव निर्माण झाला होता. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला पकडायचेच असा पोलिसांनी निश्चय केला होता.
खबर मिळताच पोलिसांनी घेतली धाव
अनिस रियाझ खान हा आरोपीचा आणि ती पोलीस महिला कर्मचारी यांच्यात जागेवर बसणे तथा सीटवरून वाद झाला होता. या वादातून त्याने मारहाण करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर महिलेने तिच्यासोबत घडलेला भयावह प्रसंग सांगत तिने जबाब पोलिसांना दिला होता. ही घटना समोर येताच सर्वत्र मोठा संताप देखील व्यक्त करण्यात आला. कोर्टाने देखील या घटनेवरून पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले होते. याप्रकरणी पोलिसांनी अनिस याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. तसेच
पोलिसांनी आरोपीला शरण येण्याचे सांगितले होते, मात्र, तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. दरम्यान, आरोपी अनिस रियाझ खान आणि त्याचे अन्य साथीदार अयोध्येतील इनायतनगर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लगेच खबर मिळताच पोलिसांनी परिसराला घेराव घालून त्याला शरण येण्यास सांगितलले मात्र, आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अनिस रियाझ खान ठार झाला. या घटनेत तीन पोलिसही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आरोपीला ठार केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
Finally, the accused was killed like this..