इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रातील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकार जोरदार हल्ला केला. ते म्हणाले भाजप आपल्या प्रसिद्धीवर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत ? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर व्टीट करत दिली आहे.
नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडल्यानंतर देशभर त्याचे पडसाड उमटलेले असतांना आज पुन्हा ७ जणांना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती देत टीका केली आहे.
याबाबत अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी, असेही चव्हाण ट्वीट मध्ये म्हटले आहेत.