इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिहारच्या जाती जनगणनेत असे दिसून आले आहे की तेथे ओबीसी, एससी, एसटी मिळून ८४ टक्के आहेत. केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी फक्त ३ ओबीसी आहेत, जे भारताच्या बजेटच्या फक्त ५ टक्के हाताळतात. त्यामुळे भारतातील जातीची आकडेवारी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जितकी लोकसंख्या जास्त तितके अधिकार जास्त – ही आमची प्रतिज्ञा असल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. त्यात त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील जाती निहाय जनगणना जाहीर केली आहे.त्यात सर्वाधिक संख्या अति मागासवर्गाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागासवर्ग आणि अति मागासवर्गाची एकूण लोकसंख्या ६३ टक्के आहे. तर यादव समाजाची लोकसंख्या १४ टक्के आहे. तर राज्यात ब्राह्मण फक्त चार टक्के आहेत. अनुसूचित जातीची लोकसंख्या २० टक्के आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर असतांना ही आकडेवारी जाहीर झाल्यामुळे त्याची देशभर चर्चा सुरु झाली आहे. या जातनिहाय जनगणनामध्ये ओबीसी, एससी, एसटी मिळून ८४ टक्के असल्याचे समोर आल्यामुळे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.