इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
प्रत्येक शाळेत गृहपाठ दिला जातो, गृहपाठ करून आणल्यावर शाळेतील शिक्षकांना गृहपाठ दाखवणे प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक ठरते. मात्र काही विद्यार्थी गृहपाठ करत नाही, त्यांना शिक्षा केली जाते. पूर्वी तर जोरदारपणे छड्या मारत असत, शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षा करूनही असे शासनाचेच आहेत, त्यामुळे त्यांना शिक्षा करण्याचे फारसे धाडस कोणी करत नाही, मात्र पंजाबातील एका शाळेने तर कहरच केला. एक शालेय विद्यार्थिनी गृहपाठाची वही घरीच विसरली म्हणून शाळेत आल्यावर तिला एक विचित्र शिक्षा केली. तिच्या कपाळावर आणि हातावर चोर असे लिहून तिला दमदाटी केली, त्यामुळे घाबरलेल्या मुलीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, या घटनेत ती मुलगी गंभीरपणे जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
कुटुंबाला धमक्या
खरे तर शिक्षण विभागाया नियमानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षा करणे गैर ठरते, मात्र लुधियाना येथील एका खासगी शाळेत मुलगी आठवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी तिची वही घरीच विसरली होती. शिक्षिकेने तिला वही आणण्यासाठी घरी पाठवले असता एका विद्यार्थिनीने मागून एक वही तिच्या बॅगेत ठेवली व तिच्यावर वही चोरीचा आळ घेतला.
विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांकडे नेण्यात आले. झडती घेतली असता तिच्या बॅगेतून वही सापडली. मुख्याध्यापकांनी कोणतीही दयामाया न करता विद्यार्थिनीच्या कपाळावर आणि हातावर ‘चोर’ लिहून तिला शाळेच्या आवारात फेरी मारायला लावली. त्यामुळे अपमान झालेल्या विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे जखमी होऊन तिच्या पाठीचा कणा तुटला असून आठवडाभरापासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र शाळेच्या व्यवस्थापनाने या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास त्यांच्या मुलीवर उपचार केले जाणार नाहीत, अशा धमक्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना दिल्याचा आरोप होत आहे. तसेच शाळा व्यवस्थापनाने या घटनेची माहिती कोणालाच दिली नाही. विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असून आता या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
शाळेबाहेर आंदोलन
विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात शाळेने असे घडलेच नाही, असे म्हणून जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबाने तक्रार केल्यावर या संदर्भात माहिती दिल्यास मुलीवर उपचार केले जाणार नाहीत, अशी दमदाटी देखील केली, यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक चांगलेच संतप्त झाले असून अशा प्रकारे शिक्षा करणे शिक्षा करणे त्या शिक्षकांना शोभत का ? अशी विचारणा आता नागरिकांकडून होत आहे, तसेच याची माहिती मिळताच काँग्रेस नेते सुशील कपूर लकी आणि गुरजित सिंग यांनी शाळेबाहेर धरणे आंदोलन केले.
यानंतर डाबा ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांकडे कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही. या संदर्भात पोलीस अधिकारी म्हणाले की, तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल. मात्र आता या घटनेची नेमकी काय चौकशी होणार ? याची चर्चा सुरू आहे.
Chor written on the forehead and hand of the student.