इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंजाबमध्ये कपूरथला येथील विले ढिलवान येथे एका तरुण कबड्डीपटूवर तलवारीने हल्ला करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हल्यानंतर जखमी अवस्थेत या खेळाडूनला घऱाबाहेर फेकून देण्यात आले. खेळाडूच्या वडिलांनी दरवाजा उघडल्यानंतर या हल्लेखोरांनी पंजाबी मधून “आह मार दित्ता तुहाडा शेर पुट्ट”. असे म्हणत दम भरला. या कबड्डी खेळाडू आणि हल्लेखोरांमध्ये वाद होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
या हल्ल्यानंतर नातेवाईकांनी या खेळाडूला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हरदीप सिंह असे या २२ वर्षीय खेळाडूचे नाव आहे. या हल्ल्यात एकूण सहा जण होते. त्यात दोन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. हरदीपचे वडील गुरनाम सिंह यांनी पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पाच ते सहा लोक त्यांच्या घरी आले आणि दरवाजा ठोठावला. यावेळी आम्ही तुझ्या मुलाला ठार केले आहे असे ते ओरडत होते. मी दरवाजा उघडला असता मुलगा गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता. त्याला जालंधरच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेनंतर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. कपूरथला येथील विले ढिलवान येथे एका तरुण कबड्डीपटूच्या निर्घृण हत्येची बातमी ऐकून धक्का बसला. मारेकऱ्यांच्या निर्भयतेची पातळी पहा; त्यांनी दार ठोठावले आणि पालकांना सांगितले: “आह मार दित्ता तुहाडा शेर पुट्ट”. ही एक वेगळी घटना नाही. पंजाबमध्ये संपूर्ण जंगलराज आहे, जिथे खून, लूट, लुटमार आणि दरोडे हे रोजचेच झाले आहेत. हे सिद्ध झालेले सत्य आहे मुख्यमंत्री भगवंतमान परिस्थिती हाताळण्यास असमर्थ आहे. त्यांनी आणखी विलंब न लावता पायउतार व्हावे.
Brutal killing of 22-year-old kabaddi player in Punjab; After hitting it, he threw it in front of the house saying ah mar ditta tuhada sher putt