पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांडातील शिक्षा भोगत असलेला आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास पोलीस कर्मचारी गस्तीवर गेले असताना ही आत्मत्या केली.
जितेंद्र शिंदा हा कोपर्डी हत्याकांडा प्रकरणात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. रविवारी कारागृहात गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याला जितेंद्र शिंदे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर जितेंद्र शिंदेला रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी जितेंद्र शिंदे याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
अहमदनगर येथील कोपर्डीत १३ जुलै २०१६ रोजी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती. निर्घृणपणे हत्या केल्याच्या आरोपांत जितेंद्र शिंदे, संतोश भवाळ व नितीन भैलुमे या तिघांना अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने २०१७ मध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. या खटल्यात सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी आरोपींविरुध्द २४ वेगवेगळे परिस्थितीजन्य पुरावे सादर केले होते.
Accused in Kopardi case committed suicide by hanging himself in Yerawada Jail